कोविड रूग्णांना पौष्टिक नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, विष्णूपंत अकोलकर यांचा उपक्रम

कोविड रूग्णांना पौष्टिक नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, विष्णूपंत अकोलकर यांचा उपक्रम

 


पाथर्डी - शहरात आ. मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मा. आ. राजीव राजळे कोविड सेंटरमधील रुग्णांना पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर व मा. आ. राजीव राजळे मित्र मंडळाच्यावतीने मांसाहारी जेवणाची मेजवानी देण्यात आली.

दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांना योग्य उपचार मिळावेत व त्यांची होणारी हेळसांड विचारात घेऊन शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी शहरात मा. आ. राजीव राजळे कोविड सेंटर उभारण्यात आले.

रुग्णांना मांसाहारी जेवण देतेवेळी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक नामदेव लबडे, नगरसेवक महेश बोरुडे, डॉ. रमेश हंडाळ, बबनराव बुचकूल, खरेदी विक्री संघाचे संचालक संदीप पठाडे, जमीर आतर, अंकुश राजळे, आप्पासाहेब राजळे, उमेश तिजोरे, हरिहर गर्जे, सोमनाथ बोरुडे, दादासाहेब कंठाळी, संदीप लोखंडे, महादेव ठोंबरे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post