दीड वर्षांपासून करोनाला वेशीबाहेर ठेवणारे आरोग्य संपन्न गाव..

 दीड वर्षांपासून करोनाला वेशीबाहेर ठेवणारे आरोग्य संपन्न गाव... चिंचणीपंढरपूर :  कोरोना संसर्गामुळे अख्खं जग अडचणीत आले असताना महाराष्ट्रातील एका  गावाने गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाला वेशीबाहेर रोखायचा  पराक्रम करुन दाखवला आहे. सरकारी नियमांचे तंतोतंत पालन, स्वच्छता आणि प्रबोधन या त्रिसुत्रीमुळे गेल्या दीड वर्षात 400 लोकसंख्या असलेल्या या गावातील एकालाही लागण करायचे धाडस कोरोनाने केले नाही किंवा ग्रामस्थांनी तशी संधीच कोरोनाला मिळू दिलेली नाही . 

सुमारे 50 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणग्रस्तांचे चिंचणी इथे पुनर्वसन झाले आणि ओसाड माळरानावर वसलेल्या येथील गावकऱ्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आज गावात पाय ठेवला की गावात फिरणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडावर मास्क दिसतो, प्रत्येक जण सोशल डिस्टन्सचे पालन करताना दिसतो. नेहमीप्रमाणेच ग्रामस्थ शेतात कामं करतात. गावाला जे लागणारे सामान  पंढरपूरमधून आणायचे असेल ती यादी घेऊन आठवड्यातून एक माणूस जातो आणि सर्व सामान घेऊन येतो. गावात आल्यावर योग्यरितीने सॅनिटाईज करुन सामानाचे वाटप होते. रोज ताजी फळे, भाजीपाला गावातच मिळतो. त्यामुळे सकस ताजा आहार, शुद्ध हवा आणि कोरोना नियमांचे पालन यामुळे चिंचणी गावाने कोरोनाला गावात एन्ट्रीच करु दिलेली नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post