नगरमध्ये डबल सीट फिरणार्यांच्या दुचाकी जप्त, पोलिसांची मोठी कारवाई


नगरमध्ये डबल सीट फिरणार्यांच्या दुचाकी जप्त, पोलिसांची मोठी कारवाईनगर:  करोना निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दुचाकीवर डबल सीट प्रवास करण्यास बंदी घातली आहे. तरीही दुचाकीवर डबल सीट फिरणार्‍यांची संख्या जास्त असल्याने अशा व्यक्तींची दुचाकीच जप्त करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे. सोमवारपासून नगर शहरात पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात करोना रूग्णसंख्येत घट होत असली तरी लोकांना मोकळीक दिल्यास एकाचवेळी रस्त्यावर, बाजारपेठेत गर्दी होऊन करोना पुन्हा वाढण्याची भिती आहे. यामुळे प्रशासनाकडून अजूनही निर्बंध शिथील केले नाही. उलट निर्बंध कडक करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दुचाकीवर डबल सीट आढळून आल्यास अशांची करोना चाचणी करून त्यांची दुचाकी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या दुचाकी 31 मेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार आहे. प्रशासनाने कितीही आदेश काढले तरी लोक दुचाकीवरून विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहे. यामुळे पोलिसांनी आता पुन्हा दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post