नियम म्हणजे नियम....पालिका कर्मचाऱ्याने स्वतःच्या आईच्या भाजीपाला विक्रीवर केली कारवाई

 नियम म्हणजे नियम....पालिका कर्मचाऱ्याने स्वतःच्या आईच्या भाजीपाला विक्रीवर केली कारवाईनगर:  कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ब्रेक द चेनचे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. काही जण कळत नकळत निर्बंध मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. शासकीय कर्मचारी निर्बंध मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्यांनं थेट आईवरचं कारवाई करुन नात्यांपेक्षा कर्तव्यनिष्ठा महत्वाची आहे हे दाखवून दिलं आहे. 

पाथर्डी नगरपरिषदेमध्ये रशीद शफी शेख हे कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. शेख यांच्या आई एका रस्त्यावर भाजीपाला विक्री करत होत्या. नगरपरिषदेचं पथक शहरातून फिरत असताना त्यांच्या निदर्शनासी ही बाब आली. त्यामुळे रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या आईवर रशीद शेख यांनी कारवाई केली. सर्व भाजीपाला जप्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post