नगर तालुक्यात आता गाव तिथे लसीकरण, ग्रामस्थांची धावपळ टळणार

 नगर तालुक्यात लसीकरणात सुसत्रता आणण्याचा प्रयत्न, गाव तेथे लसीकरण सुरूनगर : नगर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. लसीचा तुटवडा असल्याने  नगर तालुक्यात गाव तेथे लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले की, तालुक्यात नोंदणी पध्दत , टोकण पध्दत यशस्वी ठरली नाही . यामुळे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला गाव निहाय लसीकरण मोहिम सुरू करण्याची सूचना केली . ती प्रशासनाने मान्य केली असुन आता तालुक्यात प्रत्येक गावात टप्प्याटप्प्याने ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.  

नगर तालुक्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत . सध्या आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण सुरू होते .एका केंद्रात १० ते १२ गावांचा समावेश होतो . यामुळे लसीकरणासाठी एवढया गावातील लोकांची गर्दि होत असते . लसींचा मर्यादित पुरवठा व लसीकरणासाठी होणारी मोठी गर्दि यामुळे लसीकरणाचे नियोजन कोलमडत आहे .

काही ठिकाणी नोंदणी पध्दत सुरू केली मात्र ती ही अयशस्वी झाली .नंतर टोकण पध्दती सुरू करण्यात आली त्यातही वशिलेबाजीचा आरोप झाल्याने ती पध्दतही आता बंद पडली .

यावर उपाय म्हणुन नगर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी नुकतीच शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकारी , जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी , प्रांताधिकारी , तहसिलदार , गटविकास अधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली . यात लसीकरण मोहिमेत सुसुत्रता आणण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर चर्चा झाली . यात गाव तेथे लसीकरण मोहिम राबवुन तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची सुचना जि.प. सदस्य संदेश कार्ले , सभापती सुरेखा गुंड , उपसभापती दिलीप पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी मांडली . त्यास प्रशासनाने होकार दिला . तसे नियोजन करण्यात आले .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post