मोठी बातमी....महानगरपालिका उभारणार स्वत:चा ऑक्सिजन प्लांट

महानगर पालिका उभारणार स्वत:चा ऑक्सिजन प्लांट नगर: नगर शहरामध्ये ग्रामीण भागामधून करोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने रूग्णालयात दाखल होत आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून येणार्‍या काळात महानगरपालिका स्वतः च्या मालकीचा ऑक्सिजन प्लँट उभा करणार असल्याची माहिती नगरसेवक तथा मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरूडे यांनी दिली.

मनपा आरोग्य समितीने एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लँटची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी समितीचे सदस्य संजय ढोणे, सचिन शिंदे, सतीश शिंदे, निखिल वारे, किशोर वाकळे आदी उपस्थित होते. शहराचे आ. संग्राम जगताप महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करोना परिस्थितीमध्ये उपाययोजना करण्याचे काम आरोग्य समितीकडून सुरू आहे.

नगर शहरामध्ये ग्रामीण भागांमधून करोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहे. अतिसंवेदनशील करोना रुग्णांना ऑक्सिजनची प्रचंड गरज भासत आहे. यासाठी नगर शहरांमध्येच स्वतःच्या मालकीचा ऑक्सिजन प्लँट असावा या दृष्टिकोनातून समितीने रविवारी एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लँटची पाहणी करून माहिती घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post