करोना काळात बिना रिचार्ज बिनधास्त आउटगोइंग करा...जिओची मोठी घोषणा

 करोना काळात बिना रिचार्ज बिनधास्त आउटगोइंग करा... रिलायन्स जिओची मोठी घोषणानवी दिल्ली:  टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने जिओफोन ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या संकटात देश अडकलेला आहे, यामुळे या काळात जेवढ्याचे रिचार्ज केले जाईल तेवढ्याचे रिचार्ज त्या महिन्यासाठी जिओ मोफत देणार आहे. तसेच बिना रिचार्ज करता जिओफोन ग्राहक दररोज 10 मिनिटे मोफत  बोलू शकणार आहेत. यानुसार जिओ महिन्याला 300 रुपयांची मोफत आउटगोईंग सेवा देणार आहे. 

जे जिओफोन ग्राहक मोबाईल रिचार्ज करू शकतात. त्यांच्यासाठी देखील जिओने मोठी ऑफर सुरु केली आहे. जेवढा प्लॅन घ्याल तेवढाच अतिरिक्त प्लॅन त्या मुदतीसाठी वापरता येणार आहे. समजा तुम्ही जिओ फोन ग्राहक आहात, आणि तुम्ही 75 रुपयांचा 28 दिवसांचा प्लॅन रिचार्ज केला तर तुम्हाला 75 रुपयांचा आणखी एक प्लॅन मोफत दिला जाणार आहे. तुम्ही रिचार्ज केलेला प्लॅन वापरून संपला की दुसरा मोफत प्लॅन तुम्हाला वापरता येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post