लसीकरणाआधी व नंतर दारू प्यावी की नाही ?.. तज्ज्ञांनी दिला महत्त्वपूर्ण सल्ला

 

लसीकरणाआधी व नंतर दारू प्यावी की नाही ?.. तज्ज्ञांनी दिला महत्त्वपूर्ण सल्लाकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणांचं लसीकरणही सुरु झालं आहे. परंतु, लस घेण्यापूर्वी किंवा लसीकरण  झाल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयी नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. त्यातच व्हॅक्सिन घेतल्यानंतर मद्यपान म्हणजेच ड्रिंक घेण्याविषयीदेखील अनेकांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अनेक जण इंटरनेटवर लसीकरणानंतरच्या गाईडलाइन्स सर्च करत आहेत. परंतु, लसीकरणानंतर मद्यपान करणं हे घातक ठरु शकतं, असं 'इकोनॉमिक टाइम्स'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. 

कोविड लस घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर दारू प्यायल्यामुळे शरीरात विषाणूविरोधात तयार होणाऱ्या शक्तींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, मद्याचा अतिरेक केल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ शकतो. लस घेतल्यानंतर शरीरात कोरोना विषाणू विरोधात लढणारे अॅटीबॉडीज तयार होत असतात. हे अॅटीबॉडीज तयार होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे या काळात मद्यपान केल्यास ते शरीरासाठी घातक ठरू शकतं. इतकंच नाही तर, लसीमुळे निर्माण होणारे चांगले परिणाम शरीरात नीट पसरण्यासही अडथळा निर्माण होऊ शकतो.

"लसीकरणावेळी जर अल्प प्रमाणात मद्यपान केलं तर फारशी अडचण येत नाही. परंतु, प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर त्रास होऊ शकतो", असं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर व्हायरस रिसर्चचे संचालक इल्हेम मेसाऊदी यांनी सांगितलं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post