भाजीपाला, किराणा दुकान बंद असल्याने शहरात गर्दी ओसरली, रस्त्यावर सामसूम

 

भाजीपाला, किराणा दुकान बंद असल्याने शहरात गर्दी ओसरली, रस्त्यावर सामसूम
नगर: नगर महापालिका हद्दीत करोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. मेडिकल, दूध विक्री वगळता किराणा, भाजीपाला विक्री संपूर्ण बंद ठेवण्यात आल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत खरेदीसाठी होणारी गर्दीही आता गायब झाली आहे. आज सकाळी चितळे रस्त्यावर तसेच अन्य भागात सामसूम पहायला मिळाली. भाजीपाला, किराणा खरेदीसाठी होणारी गर्दी बर्यापैकी आटोक्यात आल्याने संसर्ग रोखण्यात मदत होईल. महापालिका तसेच पोलिसांची पथके शहरात ठिकठिकाणी नियुक्त असून घराबाहेर पडणार्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दंडात्मक कारवाई सुरू झाल्याने नगरकरही अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post