आ.संग्राम जगताप यांच्या प्रेरणतून अत्यल्प दरात रूग्णवाहिका सेवा कार्यान्वीत

आ.संग्राम जगताप यांच्या प्रेरणतून अत्यल्प दरात रूग्णवाहिका सेवा कार्यान्वीतनगर : करोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्र इतका प्रचंड धुमाकुळ घातला आहे की रूग्णांना गरजेच्यावेळी रूग्णवाहिका मिळणेही कठीण बनले आहे. अनेकदा मयतांना अंत्यसंस्कारासाठी नेतानाही रूग्णवाहिका मिळत नाही. काही ठिकाणी मृतदेह नेण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जातात. ही परिस्थिती ओळखून नगरमध्ये सामाजिक कार्य करणार्‍या श्री शिवप्रतिष्ठानच्या सदस्यांनी नगरकरांसाठी अत्यल्प दरात रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते या रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी  प्रतिष्ठानचे धारकरी  देविदास मुदगल, शिवाभाऊ वराडे, केदार बडवे, दिनेश जोशी, गणेश बोरुडे सर, दिपक घोडेकर, शुभम दसकन, गोविंदा नमन, भुषण झारखंडे आदी उपस्थित होते

आ.जगताप म्हणाले की, करोना काळात संवेदनशील राहून लोकांच्या उपयोगी पडण्याचे अतिशय स्तुत्य काम शिवप्रतिष्ठानच्या युवा सदस्यांनी केले आहे. अशा प्रयत्नातूनच आपण करोना महामारीचा सक्षमपणे सामना करू शकू. 

दिनेश जोशी यांनी सांगितले की, साधारण आठ दिवसांपुर्वी आमदार संग्रामभैय्या जगताप आणि माझ्या संकल्पनेतुन, नगरकरांसाठी अत्यल्प दरात रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा विचार आला. जवळच्या मित्र मंडळींच्या कानावर हि गोष्ट घातली. सुरुवात स्वतःपासुन केली आणि देवकृपेने लोकांचाही भरभरुन प्रतिसाद मिळाला आणि एक कल्पना सत्यात उतरली. संपूर्ण नगर शहरातील रूग्णांसाठी ही रूग्णवाहिका अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आली असून चोवीस तास ही रूग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. रूग्णवाहिकेसाठी संपर्क क्रमांक - 9850823235, 8421239198, 9272581515.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post