केंद्राचा मोठा निर्णय...कोविड योद्धयांना सरकारी भरतीत प्राधान्य

 केंद्राचा मोठा निर्णय...कोविड योद्धयांना सरकारी भरतीत प्राधान्यनवी दिल्लीः देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असून, ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या या संकटानंतरही देशाला डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय व कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय. NEET-PG परीक्षा कमीत कमी 4 महिने पुढे ढकलली जावी. तसेच कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. 

कोविड रुग्णांच्या सेवेत 100 दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचारी यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post