जिल्ह्यातील 'या' पोलिस निरीक्षकांची बदली करण्याची मागणी


शेवगाव पोलिस निरीक्षकांची बदली करण्याची मागणीनगर:  नागरिकांना चुकीची वागणूक देणारे शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  प्रभाकर पाटील यांची त्वरित बदली करण्यात यावी मागणी  उपविभागीय पोलिस अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  पोलिस निरीक्षक यांचे तालुक्यातील कामकाज असमाधानकारक असुन गुन्हेगारीला व अवैध व्यवसायांना चालना देणारे आहेे. गुन्हेगारांना आश्रय व सर्वसामान्य नागरिकांना त्रास अशा प्रकारचे कार्य चालु आहे . पोलिस स्टेशनमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ऊद्धट भाषा वापरणे , धमक्या देणे , महिलांना अशोभनीय भाषा वापरणे , वैद्यकीय कारणास्तव निघालेल्या नागरिकांच्या दुचाक्या जप्त करुन मारहाण करणे , सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणुक देणेे, गुन्हेगारांशी आर्थिक तडजोड करणे अशा एक ना अनेक तक्रारी आहेत. असे निवेदन अस्लम शेख , (राष्ट्रीय अध्यक्ष , पोलिस प्रोटेक्शन),प्रा.कल्याण देवढे,जावेद शेख , धनश्री सर्जे यांनी दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post