भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू यांचा पराभव

 

भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू यांचा पराभव तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थाउजंड लाईटस मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. 'द्रविड मुन्नेत्र कळघम'चे उमेदवार एलिलन यांनी १७,५२२ मतांच्या फरकानं खुशबू यांचा पराभव केलाय. खूशबू सुंदर हे तामिळ सिनेमांतील चर्चित नाव आहे. हिंदी, मल्याळ, कन्नड आणि तेलुगू सिनेमांतही त्यांनी काम केलंय. २०२० साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये दाखल होण्यापूर्वी खुशबू काँग्रेसमध्ये होत्या. त्यापूर्वीही, २०१० ते २०१४ पर्यंत त्या डीएमकेमध्येही होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post