कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!!

कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!! - आमदार नितेश राणेमुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यानं नुकसान झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. त्यावेळी त्यांनी चिवळा बीच आणि मालवणच्या नुकसानाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा प्रहार केलाय. 

मुख्यमंत्र्यांच्या एकदिवसीय पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर नितेश राणे यांनी ट्वीट केलंय. ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा. मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही. मोजून 10 km आतच. विमानतळावरचा आढावा. दौरा संपला!!! ईथे.. फडणवीसजीं चा 700kms चा झंझावात.. कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!!’, अशा शब्दात नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post