लोकप्रतिनिधी असावा तर असा....रूग्णांच्या सेवेसाठी आ.निलेश लंके यांचा कोविड सेंटरमध्येच मुक्काम

लोकप्रतिनिधी असावा तर असा....रूग्णांच्या सेवेसाठी आ.निलेश लंके यांचा कोविड सेंटरमध्येच मुक्काम पारनेर – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या परिनं मतदारसंघात कोविड सेंटर, ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल किंवा मदत केंद्र उभारून रुग्णांना सहकार्य करत आहेत. यात पारनेरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेसाठी इथेच मुक्काम करत आहेत.

बाधित रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं काम निलेश लंके यांच्या माध्यमातून होत आहे. लंके यांनी गेल्यावर्षी कर्जुले हर्या येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर उभारून साडे चार हजार कोरोना बाधित रुग्णांना मदतीचा हात दिला होता. त्यानंतर यंदाच्या कोरोना लाटेतही निलेश लंके यांनी भाळवणी येथे अकराशे बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारले आहे. रात्री बेरात्री एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागली किंवा अन्य औषधांची गरज भासली तर ते इथेच उपलब्ध राहून तात्काळ रुग्णाला मदत करतात. सध्या त्यांना एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात ते कोविड सेंटरमध्येच जमिनीवर झोपलेल्याचं दिसून येत आहे. आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post