शिक्षकांची संवेदनशीलता...मयत सहकार्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची हात

 घोगरगाव केंद्रातील शिक्षकांनी जपली माणुसकी श्रीगोंदा: कोरोना आजाराने मुत्यू झालेल्या शिक्षक मित्राच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी घोगरगाव केंद्रातील शिक्षकांनी मदतनिधी जमा करुन हातभार लावण्याचे काम शिक्षक मंडळीनी केली .

निंबळक ( ता. नगर )  येथील परमेश्वर मोरे यांचा महिनाभरापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. घोगरगाव ( ता. श्रीगोंदा ) केंद्रातील रुईखेल जिल्हा परीषद मराठी शाळेमध्ये ते शिक्षक होते .मोरे यांच्या निधनामुळे हे कुंटुबाचा आधार गेला .

 मोरे यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मोरे कुटुंबीय हे अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेले कुटुंब. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पूर्ण कुटुंब अक्षरशः वाऱ्यावर पडले.

त्यामुळे मोरे यांच्या कुटुंबाला मदतनिधी देण्याचा घोगरगाव केंद्रातील शिक्षकांनी निश्चय बांधला. व केंद्रातील सर्व शिक्षकांनी मदतनिधी गोळा करून सुमारे ७३ हजार रुपयांचा मदतनिधी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. त्यांच्या पत्नी व मुलांनी हा मदतनिधी नुकताच स्वीकारला.

 हा मदतनिधी जमा करण्यासाठी  विकास डावखरे,  अनिल ढवळे, ईश्वर नागवडे , भारत जावळे, अक्षय पवार यासह घोगरगाव केंद्रातील शिक्षकांनी पुढाकार घेतला त्यांना निंबळकचे शरद कोतकर, संतोष गेरंगे व दादासाहेब घोलप  यांनी मदत केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post