जागतिक परिचारिका दिन... नगरमध्ये नर्सिंग सेवेचा ८० वर्षांचा इतिहास

 बूथ हॉस्पीटल येथे जागतिक परिचारीका दिना निमित्त परिचारिकाचा सन्मान नगर= नर्सेस हि आरोग्य सेवेतील अतिशय महत्वाची व्यक्ती आहे. नर्स हि केवळ रुग्णांना  उपचारच देत नाही तर आधारही देत असते. बूथ हॉस्पिटल हे अहमदनगर शहरातील अतिशय जुने हॉस्पिटल आहे. एक काळ असा होता कि जेव्हा जिल्हा रुग्णालय आणि बूथ हॉस्पिटल हे दोनच हॉस्पिटल अहमदनगर शहरात कार्यरत होते. त्यावेळी आरोग्य सेवेत परिचारिकांची कमतरता होती हि बाब लक्षात घेऊन बूथ हॉस्पिटलने नर्सिंग प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरु केले.  ८० वर्षांचा नर्सिंग सेवेचा इतिहास असणाऱ्या बूथ हॉस्पिटलच्या नर्सेस चा  सर्वानाच खूप अभिमान आहे. येथील नर्सिंग सेवाने प्रेरित होऊन  अनेकांनी नर्सिंग सेवेची निवड केली, आजही  रुग्ण डिस्चार्ज होऊन जातांना परिचारिकांचे त्यांच्या सेवेबद्दल आभार मानतात व त्यांचे कौतुक करतात.


आज  याच परिचारिकांच्या सन्मानार्थ  जागतिक परिचारिका दिनानिमित्त बूथ हॉस्पिटल मध्ये परिचारिका दिन साजरा करण्यात आला. सेवा करणाऱ्या सर्व पारिचारिकांचा हॉस्पिटलच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांनी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या सेवेची आठवण करत  सर्व परिचारिकांचे कौतुक केले व त्यांच्या सेवेबद्दल त्यांचे आभारही मानले.  सर्व परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. " राहो मे काटे अगर हो , रुकना नही चलते जाना , येशू तेरे साथ है , ये तू विश्वास करना ......" या ख्रिस्ती गीत गाऊन सर्वांचे मनोबल वाढवले. 


 यावेळी  सिस्टर सत्वशीला वाघमारे , सिस्टर लता वाघमारे ,सिस्टर सरळ संसारे ,  सिस्टर मालिका साबळे , सिस्टर सुनीता पारखे , सिस्टर विद्या आढाव ,  सिस्टर विमल जाधव , सिस्टर संजीवनी जाधव ,  सिस्टर मंगल चांदेकर , सिस्टर मनोरमा राजगुरू ,ब्रदर विजय कजबे , सिस्टर रागिणी जगधने ,ब्रदर जॉन वेनॉन , सिस्टर शिल्पा शिंदे , सिस्टर निर्मल कंडारे , सिस्टर सुषमा अल्हाट , सिस्टर मरियम पंडित , सिस्टर मीना दोंडे ,  सिस्टर विद्या साळवे , सिस्टर  कल्पना साळवे , सिस्टर  दीक्षा घातविसावे , सिस्टर स्नेहा वैरागर , सिस्टर कल्याणी जाधव , सिस्टर अश्विनी बोधक , सिस्टर सोनाली कळकुंभे , सिस्टर सिमरन घोडके , सिस्टर अश्विनी साळुंके , सिस्टर   गायत्री काळे , सिस्टर  ( लेप्ट ) प्रेरणा वंजारे आदी उपिस्थत होत्या        

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post