करोनावरील 'हे' रामबाण औषध मिळवण्यासाठी हजारोंची गर्दी, खुद्द मुख्यमंत्री, उपराष्ट्रपतींनीही घेतली दखल

 

करोनावरील 'हे' रामबाण औषध मिळवण्यासाठी हजारोंची गर्दी, खुद्द मुख्यमंत्री, उपराष्ट्रपतींनीही घेतली दखल



हैदराबाद : डोळ्यात औषध टाकल्यानंतर ऑक्सिजन पातळी वाढवणारे औषध नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपट्टणम येथील एका वैद्याने तयार केले असून ते घेण्यासाठी हजारो लोक रांगा लावत आहेत. त्यांचे नाव आनंदय्या असे आहे. विशेष म्हणजे ते औषध मोफत देत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या औषधाचा गुण येत असल्यामुळे अनेक नेते, अधिकारी त्याचा लाभ घेत असून आनंदय्या यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करीत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडलेल्या रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक परवड होत असताना ही घटना आंध्र प्रदेशच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. हे औषध घेण्यासाठी शेजारील राज्यांतील हजारो लोकही येऊ लागले आहेत. यानंतर नेल्लोरचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व प्रमुख आयुर्वेदिक डॉक्टरांनी औषधाचे परिक्षण केले. त्यानंतर त्यांनी शिक्कामोर्तब केले. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमधील एका तज्ज्ञाने सांगितले की, आमच्यासमोर एका रुग्णाची ऑक्सिजन पातळी ८३ होती. डोळ्यांत दोन थेंब टाकण्यात आल्यानंतर ती ९५ पर्यंत वाढली. औषध घेतलेल्या एकाही रुग्णाने याबाबत तक्रार केलेली नाही. 

आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या औषधाच्या वापरास सरकार प्रोत्साहन देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले. .उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही याची दखल घेतली आहे. आयुष मंत्रालयाचे हंगामी मंत्री किरण रिजीजू आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या औषधाचा अभ्यास करून वितरणाबाबत पावले टाकावीत अशी सूचना त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post