करोनासाठी आता नवीन चाचणी पद्धत, थुंकीतून होणार निदान

 करोनासाठी आता नवीन चाचणी पद्धत, थुंकीतून होणार निदाननागपूर : कोरोना चाचणी करण्यासाठी RT-PCR किंवा रॅपिड एन्टिजेन टेस्टचा वापर केला जातो. पण नागपूरच्या ‘निरी’ अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्रानं  नवीन पर्याय शोधून काढलाय. या संशोधनानुसार तुमच्या थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी करण्यासाठी नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज लागणार नाही. महत्वाची बाब म्हणजे निरीच्या या संशोधनाला ICMR ने ही मान्यता दिली आहे.  RT-PCR चाचण्यांचा रिपोर्ट येण्यास 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागत आहे. अशावेळी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांना उपचार घेण्यास उशीर होत आहे. यावर पर्याय म्हणून नागपूरच्या ‘निरी’ संस्थेने नवीन पर्याय शोधून काढलाय. सलाईनमध्ये वापरलं जाणारं ग्लुकोज तोंडात घेऊन त्याची गुळणी करून ती थुंकी एका बाटलीमध्ये घेतली जाते. त्या थुंकीचा वापर आरटीपीसीआर टेस्ट साठी केला जातो.

 या पर्यायामुळे 3 तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळू शकणार आहे.  सुरुवातीला देशभरातील पाचशे लॅबमध्ये या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीमध्ये चाचणीसाठी लोकांना रांगेत लागण्याची गरज नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post