सुखात माहित नाही पण अडचणीत मी कायम तुमच्यासोबत....सुजित झावरेंचा करोना रूग्णांना भक्कम आधार

 सुखात माहित नाही पण अडचणीत मी कायम तुमच्यासोबत....सुजित झावरेंचा करोना रूग्णांना भक्कम आधार


 

पारनेर : करोनामुळे जवळची नाती दुरावत असून बाधितांपासून अनेक  जवळचे लांबच राहणे पसंत करतात. करोनाबाधित झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची फरफट सुरु होते. आर्थिक अडचणीचा सामना करताना कोणी मदतीला येईल याची आशाही धरता येत नाही. या परीक्षेच्या काळात मिळालेला छोटासा आधारही आत्मविश्वास देणारा ठरतो. असाच आधार देवून अनेक कुटुंबांना सावरण्याचे काम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सध्या चालवले आहे. 

सुजित पाटील झावरे यांनी टाकळी ढोकेश्वर येथे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील यांच्या नावाने 300 बेडचे अत्याधुनिक कोव्हिड सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यात येत आहे. आपल्या कार्यकर्त्यांबरोबरच सुजित पाटील झावरे हे स्वतः येथील कोव्हिड सेंटरवर दिवसभर थांबून रुग्णांची काळजी घेत आहेत. त्यांच्या सोबतीला जीवाभावाचे कार्यकर्तेही परिश्रम घेत आहेत. रुग्णांना औषधोपचारा बरोबरच सकस नाश्ता, जेवण दिले जात आहे. तसेच सायंकाळी रुग्णांच्या करमणुकीसाठी विविध प्रकारच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. अशाच एका कार्यक्रमादरम्यान सुजित झावरे पाटील यांनी रुग्णां समोर बोलताना सांगितले की, कारोनाच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत असून अनेकांचे जवळचे नातेवाईक कोरोना संसर्गामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.त्यांचे बिलही काही लाखात होत आहे.एवढे मोठे भरमसाठ बिल भरण्यासाठी सर्वसामान्यांची मोठी परवड होत आहे. नातेवाईकांकडे याचना करूनही कोणीही आर्थिक मदत करायला तयार नाहीत. जे नातेवाईक लग्न व विविध समारंभाप्रसंगी मोठ मोठे आहेर करतात मात्र,हेच नातेवाईक या कठीण प्रसंगी मदतीसाठी पुढे येत नसल्याचे सांगत ’सुख के सब साथी दुःख में न कोई’ हे गीत आपल्या सुमधुर आवाजात गात सुजित पाटलांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भावनिक साद घातली आहे. त्यांच्या या रचनेला रुग्णांनीही भरभरून दाद दिली


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post