मनपाने शेतकर्‍यांचा भाजीपाला प्रभागनिहाय विक्रीची व्यवस्था करावी, लोकांना फक्त संकटात टाकणे हे काम नाही

 


मनपाने शेतकर्‍यांचा भाजीपाला प्रभागनिहाय विक्रीची व्यवस्था करावीनगर- मनपा हद्दीतील शेतक-याचा भाजीपाला हा शेतमाल महानगरपालिकेने वॉर्डवाईज खरेदीकरून शहरातील नागरिकांना पुरविला पाहिजे. संकटकाळात नगरपालिकेने नागरिकांना साथ दिली पाहिजे, अशी मागणी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते बहिरनाथ वाकळे यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,  माझे महानगरपालिकेतील गुरू व माजी नगराध्यक्ष कै.शंकरराव घुले हे अध्यक्ष असताना महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यावेळी नगरपालिकेने वारूळाचा मारूती या नालेगाव भागात शेतकरी व नागरिकांच्या जनावरांसाठी गुरांची छावणी सुरू केली होती.  त्यात प्रमाणे आत्ताच्या संकटकाळात मनपा हद्दीतील शेतकरी व नागरिकांसाठी मनपाने वॉर्डवाईज भाजीपाला खरेदीकेंद्र सुरू करून नागरिकांना भाजीपाला पुरविला पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य आहे. लोकांना फक्त संकटात टाकणे हे काम नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post