२ लाखांची लाच, मंडलाधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

 २ लाखांची लाच, मंडलाधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यातनगर: वडिलांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीची 7/12 वर नाव लावायला 3 लाखांची मागणी केली होती. त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत पथकाने राहाता येथील मंडलअधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यास 2 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे पोलीस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम तसेच पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी पोलीस नाईक नितीन कराड प्रभाकर गवळी चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने दोन लाख रुपयांची लाच घेणार्‍या मंडल अधिकार्‍यास रंगेहाथ पकडून सापळा यशस्वी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post