२०१४ नंतर पंतप्रधान मोदींबाबत प्रथमच घडली 'ही' गोष्ट

 

करोना काळात मोदींच्या लोकप्रियतेला उतरती कळानवी दिल्ली - करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नियोजनावरुन केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका होता असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेलाही या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आलेल्या अपयशाच्या आरोपांमुळे कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या 'ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग'च्या आकडेवारीनुसार मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. तर अन्य एका सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदाच मोदींची लोकप्रियतेचा आलेख ५० टक्क्यांच्या खाली उतरलाय.

केवळ मॉर्निंग कन्सल्टच्या अ‍ॅप्रूवल रेटिंगमध्येच नाही तर भारतीय पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्येही मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. २३ राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमधील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आळं. यामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेआधी मोदींची लोकप्रियता ५७ टक्क्यांपर्यंत होती. मात्र ११ मे पर्यंत यामध्ये ९ टक्क्यांची घसरण झाली आणि ती थेट ४८ टक्क्यांवर आली. पहिल्यांदाच मोदींची लोकप्रियता ५० टक्क्यांच्या खाली आल्याचं संस्थेचं म्हणणं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post