वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघ जाहीर

 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघ जाहीरमुंबई : जून महिन्यात टीम इंडिया  विरुद्ध न्यूझीलंड   यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 चा अंतिम सामना  खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे. या अंतिम सामन्यासाठी या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हा अंतिम सामना 18 ते 23 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. 

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post