लसीकरण केंद्रावर मध्यरात्री बिछान्यासह रांगा...

 लसीकरणाने उडवल्या नागरिकांच्या झोपा


लसीकरण ठिकाणी येते आहे बिछान्यासह..




श्रीरामपुर - लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले असून लसीकरणासाठी रात्र जागून काढत आहेत.ग्रामीण रुग्णालय शिरसगाव अंतर्गत आजाद मैदान श्रीरामपुर येथे रात्री रांगा लावत असून शनिवार (दि. १६) पहाटे ३:०० वाजता १५० नंबर झाल्याचे दृष्य पहायल  मिळाले. टू व्हीलर व फोर व्हीलर घेऊन लोक लसीकरण ठिकाणी मुक्काम करत आहेत.

शहरात व ग्रामीण मध्ये पहिला डोस घेतलेल्या अनेक नागरिकांचा बुस्टर म्हणजे दुसऱ्या डोससाठी कालावधी उलटून गेल्यावर अद्याप लस मिळू शकलेली नाही.सध्या कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सीन अशा दोन लसींचा पुरवठा केला जातो आहे. त्यात कोव्हीशील्डची नियमित तर कोव्हॅक्सीनचा पुरवठा अनियमित होत आहे. सुरवातीच्या काळात कोव्हॅक्सीनची लस घेतली त्यांना दुसरा डोस मिळण्यात अडचण निर्माण झाली होती.

मला लस घेऊन ५५ दिवस झाले. रोज चकरा मारतो आहे.असेच लासिकरणासाठी येणारे नागरिक सागात आहेत.नागरिक रात्रीच येऊन बसत असल्याने सकाळी आलेल्यांना लस मिळत नाही. मायबाप सरकारने यावर लक्ष घालून घर घर जाऊ ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण करावे हीच विनंती सर्व नागरिक करत आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post