माजी जि.प.सदस्य मोहनराव पालवे यांचे निधन

 माजी जि.प.सदस्य मोहनराव पालवे यांचे निधननगर : माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. कोल्हार कोल्हूबाई(ता.पाथर्डी) हे त्यांचे गाव आहे.मुंबईत अनेक वर्षे ते ट्रकचालक होते. गावी आल्यानंतर त्यांनी मित्रांच्या मदतीने शिवसेनेची शाखा सुरू केली. मिरीकरंजी जिल्हा परिषद गटाचे ते सलग पंधरा वर्षे सदस्य होते. शिवसेनेचे  तालुका प्रमुखपदाचीही जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे पेलली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post