सरपंचाकडे १० हजारांच्या खंडणीची मागणी, एका विरूद्ध गुन्हा दाखल


सरपंचाकडे १० हजारांच्या खंडणीची मागणी, एका विरूद्ध गुन्हा दाखलनगर:  वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे फोन वरून 10,000 रुपये रोख रकमेची खंडणी मागितली व पैसे नाही दिले तर ग्रामपंचायत कार्यालयाची बदनामी करणारी बातमी प्रकाशित करण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी येथील जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमित्त रुई ग्रामपंचायतचे सरपंच संदीप बाबासाहेब वाबळे यांना 8 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021 या दरम्यान फोन करुन 10,000 रुपये रोख रकमेची खंडणी मागितली व पैसे नाही दिले तर ग्रामपंचायत कार्यालयाची बदनामी करणारी बातमी प्रकाशित करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी पैसे दिले नाही म्हणून   त्याचे दैनिक साई दर्शन मध्ये  ग्रामपंचायत कार्यालयाची बदनामी करणारी बातमी प्रकाशित केली.

याप्रकरणी संदिप बाबासाहेब वाबळे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांचेविरुध्द भादंवि कलम 385, 500, 501, 502, 504, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपवते हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post