पत्नीबरोबर अनैतिक सबंधाच्या संशयावरुन मित्राची निर्घुण हत्या...

 


पत्नीबरोबर अनैतिक सबंधाच्या संशयावरुन मित्राची निर्घुण हत्या...मुंबई   : तरुणाने आपल्या मित्राचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपारा भागातील राहत्या घरीच आरोपीने आपल्या मित्राला संपवलं. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  नालासोपारा पूर्व आचोळे डोंगरी भागात ही घटना घडली. आरोपी संदीप साहू याने त्याच्या रहात्या घरातच दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मित्र राहुल याची हत्या केली. घरातील हातोडी, भाजी कापायचा लांब चाकू आणि स्टिलच्या झारा याने डोक्यावर, पाठीवर, अंगावर ठिकठिकाणी वार करुन हत्या केली आहे. मयत राहुल हा आरोपी संदीप साहूच्या घरीच राहायचा. राहुलचे आपल्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून संदीपने राहुलची निर्घृण हत्या केली. तुळींज पोलिसांनी आरोपी संदीपला अटक केला आहे. त्याच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हत्या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post