माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी या राज्यांत काँग्रेस फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. या पराभवानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची नुकतीच बैठक झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाच राज्यांतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद, मनीष तिवारी, व्हिन्सेंट एच. पाला आणि जोथी मनी यांचा या समितीत समावेश आहे. पाच राज्यांना भेट देऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी, उमेदवारांशी आणि राज्याच्या नेतृत्वाशी चर्चा करून ही समिती एक अहवाल तयार करेल आणि तो काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधींसमोर सादर करेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post