रूग्णांची थेट भेट घेऊन आधार, सोशल मीडियावर आ.संग्राम जगताप यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

 पायाला भिंगरी लावून रूग्णांची थेट भेट घेऊन आधार, सोशल मीडियावर आ.संग्राम जगताप यांच्यावर कौतुकाचा वर्षाव



नगर: कोरोनाच्या या दुसऱ्या महाभयंकर लाटेत एकीकडे अनेक राजकीय नेते स्वतःच्या सोयीनुसार स्वतःच्या वैयक्तिक हेव्यादाव्या पोटी आरोप-प्रत्यारोप करत या संकटातही संधी साधत राजकारण करताना दिसत आहेत.

तर दुसरीकडे नगर शहरात आमदार संग्राम जगताप सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत पायाला भिंगरी लावून वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये लोकांना आधार देताना आणि ताणलेल्या वैद्यकीय व्यवस्थेत समन्वय साधताना दिसत आहेत.

शहरातील व जिल्ह्यातील अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक सोशल मीडियावर आमदार संग्राम जगताप यांचे धन्यवाद मानताना दिसत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post