भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली महिलेला दारु पाजून अत्याचार, भोंदूबाबा अटकेत

भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली महिलेला दारु पाजून अत्याचार, भोंदूबाबा अटकेत कोरोनाचं  संकट असताना भोंदूबाबा देखिल नागरिकांमधील अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. संगमनेरच्या पारेगाव बुद्रूक या गावात एक असाच प्रकार घडला आहे. याठिकाणी भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका मांत्रिकानं महिलेवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. 

संगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव बुद्रुक गावातील महिलेवर अत्याचाराचा हा प्रकार घडला आहे. गावातील एका महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून काही त्रास होत होते. पण डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याऐवजी अंधश्रद्धेला बळी पडत ते एका भोंदूबाबाकडे गेले.  महिलेनंही त्या मांत्रिकावर विश्वास ठेवत खरंच आपल्याला भूतबाधा झाली आहे, यावर विश्वास ठेवला. मांत्रिकानं सांगितल्याप्रमाणं महिला पतीला सोबत घेऊन मांत्रिकाकडे भूतबाधा उतरवण्यासाठी गेली. पण या मांत्रिकाने महिलेला बळजबरी दारू पाजली. त्यानंतर तिला शेतामध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला. या सर्व प्रकारानंतर महिलेनं या मांत्रिकाच्या विरोधात संगमनेर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधत कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post