आ.लंके यांच्या कोविड सेंटरचे शिवसेनेलाही कौतुक, तालुकाप्रमुख बंडूशेठ रोहोकले यांची मदत

 


आ.लंके यांच्या कोविड सेंटरचे शिवसेनेलाही कौतुक, तालुकाप्रमुख बंडूशेठ रोहोकले यांची मदतनगर : पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणीत सुरु केलेले 1100 बेडचे कोविड केअर सेंटर राज्यात नावाजले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तर आ.लंके हे आयकॉनिक आमदार बनले आहेत. त्यांच्या कार्याने विरोधी पक्षातील नेतेही प्रभावीत होत आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी या कोविड सेंटरला भेट देवून आ.लंके यांच्या कार्याचे कौतुक केले. यानंतर आता पारनेर शिवसेनेने आ.लंके यांच्या कार्याची दखल घेतली आहे. पारनेरचे शिवसेना तालुकाप्रमुख विकास (बंडूशेठ) रोहकले यांनी या कोविड सेंटरला भेट दिली. आ.लंके यांची भेट घेत त्यांनी कोविड सेंटरसाठी 51 हजारांची मदतही केली. दरम्यान रोहोकले यांनी सांगितले की, आपल्या परिसरात असलेल्या सर्वच कोविड सेंटरला आपण मदत करणार असून आताच्या काळात करोना रूग्णांना जितका दिलासा देता येईल तितके प्रयत्न करण्याचा आपला मानस आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post