बेलवंडी येथे रक्तदान व प्लाझ्मा नाव नोंदणी शिबीर संपन्न...

 बेलवंडी येथे रक्तदान व प्लाझ्मा नाव नोंदणी शिबीर संपन्न...

रक्तदात्याला प्रमाणपत्र व झाड देऊन केला गौरव...


रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे भैरवनाथ सेवा सोसायटी व बेलवंडी व्यापारी पतसंस्था च्या वतीने रक्तदान शिबिर व प्लाझ्मा नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री.अण्णासाहेब शेलार व बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रकाश बोराडे यांच्या शुभहस्ते पार पडले.

         आज दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.कोरोना रुग्णावर प्रभावी उपचार म्हणून प्लाझ्मा चा वापर फायदेशीर ठरत आहे.त्यामुळे रक्तदान बरोबर प्लाझ्मा दान देखील नागरिकांनी करावे यासाठी बेलवंडी येथे प्लाझ्मा नाव नोंदणी करण्यात आली .

           अहमदनगर येथील अर्पण रक्तपेढी चे आरोग्य सेवक  सकाळी 8 वाजता बेलवंडी येथे येऊन सर्व व्यवस्था केली. आलेल्या नागरिकांचे ,रक्त तपासणी करून, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स च पालन करून शिबिरास सुरवात झाली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. यामध्ये तरुण वर्गाचा मोठया प्रमाणावर सहभाग दिसून येत होता. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 70 रक्त दात्यांनी सहभाग नोंदवला. 

           रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास भैरवनाथ सोसायटी व व्यापारी पतसंस्थेच्या वतीने फळांचा अल्पोपहार, आंब्याचे झाड, व अर्पण रक्तपेढी च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदात्याना रक्तदानाचे प्रमाणपत्र व आंब्याचे झाडाचे वितरण  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणासाहेब शेलार, दिनेश इथापे, जयसिंग लबडे,उपसरपंच उत्तम डाके, सुभाष काळाने,सोपान हिरवे, किसन वऱ्हाडे,सुनील ढवळे, सावता हिरवे, दिलीप रासकर, संदीप तरटे, दीपक कुलांगे,सचिन हिरवे,दौलत हिरवे,संदीप घोडेकर, निवृत्ती शेलार,सागर जगताप, सुधाकर क्षीरसागर,गोपीनाथ खेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post