पंढरपुरात भाजपचा जल्लोष, समाधान आवताडैंच्या घराबाहेर गुलालाची उधळण


 

सोलापूर - राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपाच्या समाधान आवताडे यांनी सहाव्या फेरीनंतर शेवटपर्यंत आघाडी घेतली. अद्याप दोन फेऱ्या बाकी आहेत, पण भाजपा समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत. समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post