महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई...अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे तब्बल 21 कोटींचे युरेनियम जप्त

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई...अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे तब्बल 21 कोटींचे युरेनियम जप्त

 


महाराष्ट्र एटीएसने  मुंबईत मोठी कारवाई केली आहे. अणुबॉम्ब बनविण्यासाठी लागणारे तब्बल 7 किलो युरेनियम जप्त केले असून दोन जणांना अटक केली आहे. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारात 21 कोटी एवढी किंमत आहे.  आण्विक शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी युरेनियमचा वापर केला जातो. हे दोघे आरोपी हे युरेनियम खरेदीदाराच्या प्रतिक्षेत होते. तेव्हा एटीएसने सापळा रचून त्यांना पकडले आहे. हे युरेनियम भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरकडे चाचणीसाठी पाठविले होते, यामध्ये हे युरेनियम उच्च दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. जिगर पांड्या (रा. ठाणे), अबु ताहीर (रा. मानखुर्द) या दोघांना अटक करण्यात आली आहे. जिगर हा युरेनियम विक्रीसाठी नागपाड्याला येणार असल्याची टीप एटीएसला मिळाली होती. यानुसार एटीएसने सापळा रचला व जिगरला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अबु ताहीरने हे युरेनियम दिल्याचे सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post