स्टेट बँकेकडून ATM वापर, चेक बुकसाठीच्या सेवा शुल्कात बदल

स्टेट बँकेकडून ATM वापर, चेक बुकसाठीच्या सेवा शुल्कात बदल नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम, रोकड पैसे काढणे, चेक बुक इत्यादीवरील सेवा शुल्क बदलण्याचा निर्णय घेतलाय. हे बदल बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यांना लागू होतील. 1 जुलै 2021 पासून नवीन शुल्क आकारले जाईल. 

जर तुम्ही SBI च्या एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला चार मोफत रोख रकमेचे व्यवहार करता येतात. यापेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास ते बँकेच्या शाखेतल्या एटीएममधून असो की दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून, त्या प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी द्यावे लागतील.

एसबीआय बीएसबीडी खातेदारांना आर्थिक वर्षात 10 पानांचे चेकबुक दिले जाते. त्यानंतर जर आपण 10 पानांचे चेकबुक घेतले, तर त्यासाठी 40 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल. आपण 25 पानांचे चेकबुक घेतल्यास 75 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल. आपत्कालीन चेक बुकसाठी 10 पाने किंवा त्याहून अधिक शुल्क 50 रुपये आणि जीएसटी आकारले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवरील नवीन सेवा शुल्कापासून सूट देण्यात आलीय. याशिवाय एसबीआय आणि बिगर एसबीआय बँक शाखांमधील बीएसबीडी खातेदारांकडून गैर-आर्थिक व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post