लसीकरणासह उपचारापर्यंत आरोग्य कर्मचार्‍यांवर दबाव आणण्याचे प्रकार, संबंधितांना आवर घालण्याची मागणी अहमदनगर- कोविड १९ या महामारीच्या काळात मागील १ वर्षाच्या कालावधी पासुन कोणतीही शासकीय/ सार्वजनिक अथवा आठवडा सुटटी न घेता रात्रंदिवस आरोग्य यंत्रणेतील अधिकारी/ कर्मचारी स्वत: आजारी पडले तरी घरी राहुन या महामारीचे काळात वेगवेगळे अहवाल, कामकाजाचे नियोजन करत आहेत. तसेच घरातील व्यक्ती अथवा नातेवाईक आजारी असतानाही आरोग्य विभागातील अधिकारी/ कर्मचारी नियमितपणे कामकाज करत आहेत. अशाप्रकारे आरोग्य सेवा देत असताना व सदरील कामकाजाचा ताण वाढत चाललेला असताना आरोग्य विभागातील अधिकारी/ कर्मचारी कमी मनुष्यबळामध्ये कामकाज व्यवस्थित करत आहे. तसेच कोविड १९ या महामारीच्या काळात कामकाज करत असताना आरोग्य विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी मानसिक तणावात कामकाज करत आहेत.


तथापी आरोग्य सेवेचे कामकाज करत असताना ग्रामस्थांचे कोविड १९ चे लसीकरण करताना ज्या व्यक्तीना लस साठा तपासणीचा अधिकार नाही अशा व्यक्ती डी फ्रीजर मध्ये हात घालुन लस आहे किंवा नाही हे बळजबरीने पहाणे, अॅन्टीजन टेस्ट करताना, कोविड पॉझीटीव्ह रुग्णांना अॅडमिट करताना शासकीय निकषाप्रमाणे कामकाज होणे अपेक्षित असताना त्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न ग्रामपातळी ते जिल्हापातळी पर्यन्तचे कार्यकर्ते नेते मंडळी करत असल्याचे जाणवत आहे. तसेच पॉझीटीव्ह रुग्ण मयत झाले नंतर त्यांचे अत्यावेधी साठी आरोग्य विभागास जबाबदार धरले जात असलेचा प्रकार घडत आहे. तसेच ग्रामपातळी ते जिल्हापातळी पर्यन्तचे कार्यकर्ते नेते मंडळी यांचेकडुन आरोग्य विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना रात्री अपरात्री वेळी अवेळी दुरध्वनी करुन दबावतंत्राची भाषा वापरल्याचे प्रकार घडल्याचे निदर्शणास येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. तसेच आरोग्य विभागात मोठया प्रमाणात महिला अधिकारी / कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना अशा प्रकारे वेळी अवेळी फोन करुन दबावाची भाषा वापरल्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शणास येत आहे ही बाब सामाजिकदृष्ट्या अयोग्य आहे.


तथापी या पत्रादवारे आपणास विनंती करण्यात येते की, आपले स्तरावरुन ग्रामपातळी ते जिल्हापातळी पर्यन्तचे कार्यकर्ते/ नेते मंडळी यांना आवाहन करण्यात यावे की, वेड १९ या महामारीच्या काळात कोविड योध्दे म्हणून कार्यरत असणारे आरोग्य विभागातील कार्यरत सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचे मनोबल वाढविणे कामी सहकार्य करावे. तसेच महिला अधिकारी/ कर्मचारी यांचे बरोबर सन्मानपुर्वक संवाद साधावा जेणे करून संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांचा मानसिक तनाव वाढणार नाही. सदर बाबत आपणाकडुन सहकार्य होईल हीच अपेक्षा आहे.

तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे ,डाॅ. अनिल ससाणे , डॉ. भारत कोठुळे .डॉ. निवेदिता माने , डॉ. रश्मी शिंदे , डॉ. शुंभागी पवार , डॉ. प्रियका पवार , डॉ. प्रिंयका शेंदुरकर , डॉ. कल्पना पोहरे , डॉ. सुप्रिया थोर बले सह आदि डॉक्टर्स यांनी निवेदन दिले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post