काँग्रेसच्या आंदोलनानंतर मनपाला आली जाग.. ऑक्सीजन बेडसाठी मागविल्या निविदा

काँग्रेसच्या आंदोलनानंतर मनपाला आली जाग.. ऑक्सीजन बेडसाठी मागविल्या निविदा ;

१६१ ऑक्सिजन बेड उभारणार, स्व-ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पही उभारणार प्रतिनिधी : नगर शहरातील नागरिकांसाठी मनपाने जंबो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारावे यासाठी काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात केलेल्या मुक्कामी आंदोलनानंतर मनपाला अखेर जाग आली आहे. १६१ ऑक्सिजन बेडच्या उभारणीसाठी मनपाने निविदा मागविल्या आहेत. तसेच काँग्रेसच्या मागणी वरून मनपाने स्वतःच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांची ऑक्सिजन बेडसाठी होणाऱ्या वेदनादायी फरफटीला वाचा फोडत महापालिकेमध्ये मुक्कामी आंदोलनाद्वारे नगरकरांची व्यथा मांडत काँग्रेसने महापालिकेला १००० बेडचे जंबो ऑक्सिजन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. मात्र मनपाकडून सुरुवातीला प्रतिसाद देण्यात आला नव्हता. 

पण अखेर काँग्रेसने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगरकरांसाठी ऐतिहासिक आंदोलन छेडत मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते यांच्यासह मुक्काम ठोकला होता. काँग्रेसचे अनंत गारदे, खलील सय्यद, फारुक शेख, अक्षय कुलट, रियाझ शेख हे देखील सहभागी झाले होते. मनपाने काळे यांच्यासह काँग्रेस आंदोलनकर्त्यावर गुन्हे देखील दाखल केले होते.
दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी काँग्रेसला या बाबतीत ठोस आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले होते. 

अखेर या आंदोलनानंतर मनपा प्रशासन जागे झाले असून नगर शहरामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे १६१ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागविल्या अाहेत. शासकीय तंत्रनिकेतनला ६०, आयुर्वेद महाविद्याल यात २७ जैन पितळे बोर्डिंग येथे ७४ ऑक्सिजन बेड उभे करण्यात येणार आहेत. ऑक्सिजन बेडपर्यंत कॉपर धातूची लाईन बसवावी लागते. ही लाईन बसवण्यासाठी खासगी संस्थांकडून मागविण्यात आल्या आहेत. एका बेडसाठी सुमारे १४ हजार रुपये खर्च येणार असून ते काम खासगी संस्थेकडून करून घेतले जाणार आहेत.

काँग्रेसच्या दबावामुळेच आमदार ॲक्टिव्ह मोडमध्ये
----------------------------------------------------
काँग्रेसने नगर शहरामध्ये कोरोनासाठी केलेले काम आणि नागरिकांसाठी ऑक्सीजन बेड, लसीकरण या विविध मागण्यांवर निर्माण केलेला नागरीकांचा दबाव यामुळेच शहराच्या आमदारांना नाईलाजास्तव का होईना पण ॲक्टिव्ह मोडमध्ये यावे लागले असल्याचा दावा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. आयुर्वेद महाविद्यालयामध्ये होणारे २७ ऑक्सिजन बेड हे काँग्रेसच्याच दबावामुळे उभे राहत असल्याचाही दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. इथून पुढील काळात देखील सामान्यांच्या प्रश्नावरती, नागरी समस्यांवरती झोपलेल्या मनपा, आमदार यांना जागे करण्याचे काम काँग्रेसच्या वतीने असेच सुरू राहील, असे काळे यांनी म्हटले आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post