सोने, कापड दुकानातून गुपचुप विक्री, मनपाने ठोठावला दंड

सोने, कापड दुकानातून गुपचुप विक्री, मनपाने ठोठावला दंड नगर : लॉकडाऊन असतांना देखील चोरून मालाची विक्री करणार्‍या महापालिकेच्या पथकांने कारवाईचा बडगा उगारला. महापालिकेचे दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान यांच्या पथकाने माळीवाडा, गंजबाजार, ख्रिस्त गल्ली, मंगलगेट परिसरात कारवाई करत दंड वसलू केला. दरम्यान यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पथकांकडून देण्यात आला आहे.

या कारवाईत राहुल साबळे, सूर्यभान देवघडे, नंदकुमार नेमाणे, राजेश आनंद, भास्कर आकुबत्तीन, अमोल लहारे  यांनी सहभाग घेतला.  सावेडीतील  सराफ, कापडबाजार परिसरातील  दुकान, फळ विक्रेते, गंज बाजार, माळीवाडा, ख्रिस्त गल्ली, ग्राहक भांडार जवळील दुकानांवर कारवाई करत तब्बल 17 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच डॉमिनोज पिझ्झा या आस्थापनावर परवानगी नसताना आस्थापना उघडले बद्दल 10  जारांचा दंड वसूल करण्यात आल्याचे दक्षता पथक प्रमुख यांनी सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post