माजी आ.वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटरला १ लाखांच्या औषधांची मदत

 माजी आ.वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटरला १ लाखांच्या औषधांची मदतनगर: पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या पुढाकाराने प्रियदर्शनी पब्लिक स्कूल मध्ये स्वर्गीय माजी आमदार वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटर सुरू झालं आहे. त्यामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कोविड सेंटरला मदत म्हणून सुजित झावरे पाटील यांचे विश्वासू सहकारी देवकृपा परिवारातील पारनेर येथील दिपक नाईक,  योगेश मते,  महेंद्र मगर यांच्यावतिने एक लाख रुपयांचे औषधे देण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post