अडचणीच्या काळात नाभिक समाज बांधवांना सुजित झावरे पाटील यांचा मोठा आधार

 

 व्यवसाय बंद असल्याने अडचणीत सापडलेल्या नाभिक बांधवांना सुजित झावरे पाटील यांचा मदतीचा हातनगर- गेले दोन महिन्यापासून कोरोना सारख्या महामारी मध्ये नाभिक समाजाची कात्री बंद आहे.त्यामूळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आज सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपात तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळ, कान्हूर पठार, वासुंदे गावातील नाभिक बांधवांना जीवानावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. पारनेर तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधवांना लवकरच जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी सुजित झावरे पाटील यांनी नाभिक समाजाचे प्रश्न उपस्थित केला. नाभिक समाजासाठी राज्य शासनानी मदत करावी जेणे करून त्यांना उपासमारीची वेळ येणार नाही. यावेळी किसनराव धुमाळ, अमोल साळवे, मोहनराव रोकडे, अशोक पाटोळे, करन टोपले, संदीप खंडाळे, गोरख ताठे, गणेश खंडाळे, पोपटराव आतकर, बाळासाहेब खंडाळे, पंढरीनाथ आतकर, नारायण खंडाळे, विनायक कुठे, आत्माराम खंडाळे, राहुल खंडाळे, अमोल खंडाळे, मुरली आतकर, पांढुरंग जाधव, भरत खंडाळे, निलेश आतकर, दीपक आतकर, निलेश गायकवाड, बंडू राऊत, योगेश शिंदे, गणेश यादव, पंडित दाजी तसेच परिसरातील नाभिक समाज बांधव उपस्थितीत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post