कशासाठी प्रशासनाच्या आदेशाची, विनंतीची वाट पहायची?

 *कशासाठी प्रशासनाच्या आदेशाची, विनंतीची  वाट पहायची??*बातम्या पहायच्या, ऐकायच्या आणि त्यावर चर्चा झोडत बसायच्या....
आपणच आपलं सुधारून घ्यायला हवं.. 
आज आपल्या जिल्ह्यात म्हणजे अहमदनगर मधे 4200 च्या आसपास positive detect झालेत.
बाहेर औषधे मिळतं नाहीत. ऑक्सिजन , इंजेक्शन मिळण्यासाठी किती कष्ट, धावपळ चालू आहे. हे प्रत्येकाला माहीत आहे.
तरीही बरेच लोकं इकडे काय झालं, तिकडे काय झालं, उद्यापासून कडक लॉक डाऊन, भाजी बंद.. इत्यादी इत्यादी.. यावर नुसत्या गप्पा झोडत आहेत...
जरा आता तरी शहाणे व्हा.. कुणी आदेश देण्याची वाट पाहताच कशाला??
इतरांची काळजी सोडा, तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाचं बघा..
 करोनाने आपल्या दारावर टकटक केली ना, तेव्हा तुमचे डोळे उघडणार आहेत का??
जरासा ताप आल्यासारखं वाटू लागल्यावर मग पहा कसा घाम येईल...
खोकला आला की कसं  काहीं बाही डोळ्यांसमोर तरंगू लागेल तुमच्या..??
हे दिवस स्वतः स्वतःलाच जपायचे आहेत.. बोंबलत चकाट्या, साऱ्या दुनियेच्या चर्चा तिखट मीठ लावून ऐकण्याचे नाहीत...
गेलं मातीत राजकारण..? गेले तुमचे आवडते पक्ष, नेते..
दया हे सोडून..
 सरकार, जे तुम्हाला सांगत आहे.. ते ऐका प्लीज.. मग ते कोणाचही असो..तुमच्याबाजूचे की तुमच्या विरोधी विचारांचे..
नका फार विचार करू आता..
कोणीही येणार नाही,
आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे...
हा संसर्ग आहे.. घरात मुले असतील, पत्नी असेल, आई, बाबा, नातवंडे असतील.. प्लीज त्यांची काळजी घ्या..
काही बिघडत नाही दोन दिवस भाजी आणली नाहीतर..
कडधान्य खावू ना..
पण कोणाच्या आदेशाची, पोलीस आले की इकडे तिकडे लपू... अशी वाट पाहू नका..
हॉस्पिटल भेटेनाशी झाली आहेत...
वेळ आली की आपल्यालाही काही सुचनार नाही..
आपणही एकटेच असू... मित्रांचा लवाजमा नसेल बरोबर.. हे लक्षात असू द्या..
आज आपला पेशंट एडमिट असेल तर त्याला भेटायलाही जाता येत नाही..
*पूर्वी आजी ऍडमिट असली की आपण जसे रात्री आजी जवळ असायचो. सलाईन संपल की सिस्टर ला लगेच सांगायचो..*नातेवाईक, मित्र मैत्रीणी भेटायला यायचे..* *गप्पा चालायच्या...* 
*आपला रुग्ण ही सुखावून जायचा..*
*आता ते ही दिवस राहिले नाहीत..*
*आपला माणूस वरच्या मजल्यावर..* *आणि आपण हॉस्पिटल बाहेर घुटमळत...*
*हे असं आहे..*
🙏 प्लीज, थोडं भान असू दया...
काही लोक, कुटुंब कितीतरी दिवसांपासून घराच्या बाहेर पडत नाहीत... त्यांना सेलुटच केला पाहिजे..
आपणं सगळेच काळजी घेवू या..
या सुंदर जगात काहीच दिवसांनी मोकळेपणाने भेटायचं आहे आपल्याला..
तेव्हा प्लीज... आपणचं आपले संरक्षक होऊ या..
*आज आकडा वाढला आहे...म्हणून रहावलं नाही...*
*तुम्हीं माझी प्रेमाची माणसे आहांत...*

*जयंत येलुलकर, रसिक ग्रुप,* 
*अहमदनगर*
*माजी नगरसेवक* 
*1 मे 2021*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post