करून दाखवले...नगर तालुक्यातील 'हे' गाव झाले करोनामुक्त

 नगर तालुक्यातील विळद गाव झाले करोनामुक्तनगर - करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी जबाबदारीने पालन केल्याने आणि ग्रामपंचायतीद्वारे केलेल्या उपाययोजनांमुळे नगर तालुक्यातील विळद हे गाव करोनामुक्त झाले असल्याची माहिती सरपंच संजय बाचकर यांनी दिली आहे.

विळदमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढता करोना संसर्ग गावाची चिंता वाढविणारा होता. करोनामुळे आप्तस्वकीय गमावल्याने गावातील काही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी गावातील स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि गावातील तरुण स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला तर गावातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे योग्यरित्या पालन करून करोनाला अखेर गावातून हद्दपार केले. करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांनी घरातच विलगीकरणात राहून उपचार घेतले.

सोमवारी  शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विळद ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली.

यावेळी पर्यवेक्षक श्री.गोरे, तलाठी श्री.लोंढे, सरपंच संजय बाचकर, उपसरपंच स्वाती निमसे, ग्रामसेविका सौ. गायकवाड, माजी सरपंच मनीषा बाचकर, कैलास अडसुरे, सागर जगताप, राजेंद्र निकम, अजीज शेख, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रशांत अडसुरे, वनसमितीचे उपाध्यक्ष संतोष अडसुरे, संदीप जगताप, हनीप शेख, विकास शिंदे, बापूसाहेब जगताप उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post