आ.विखे पाटील यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत

आ.विखे पाटील यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत नगर-आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांसाठी लागणार्‍या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी 14,775 कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकर्‍यांना मागील वर्षीच्या जुन्याच भावाने रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचा शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आ. विखे पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने रासायनिक खतांसाठी आणखी 14,775 कोटी रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डीएपी खतासाठीची सबसिडी 140 टक्के वाढली असून आता शेतकर्‍यांना डीएपी खताची गोणी मागील वर्षीच्याच म्हणजे 1200 रुपये भावाने उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने केंद्र सरकारचा निर्णय शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्याच पध्दतीने आजचा निर्णयही स्वागतार्ह असल्याचे विखे पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post