लसीकरण केंद्रांवर व्हीआयपी कल्चर थांबवा, शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी उठवला आवाज

 लसीकरण केंद्रांवर व्हीआयपी लोकांच्या शिफारशीवर नोंदणी न करता लसीकरण, पोलिस बंदोबस्त नेमावा

नगरसेवक योगीराज गाडे यांचे मनपा आयुक्तांना निवेदननगर: राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झालं आहे. मात्र नगर शहरात मनपाच्या लसीकरण केंद्रांवर तथाकथित व्हीआयपी लोकांच्या शिफारशी नुसार ऑनलाईन नोंदणी न केलेल्यांना लस देण्यात येत आहे. यासाठी मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नोंदणी केलेले नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. मनपा आयुक्तांनी सदर व्हिआयपी लोकांच्या शिफारशी आवराव्यात तसेच लसीकरण केंद्रांवर पोलिस बंदोबस्त नेमावा अशी मागणी शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,दिनांक ०१/०५/२०२१ रोजी पासून वय वर्ष १८ ते ४४ या वयोगटातील लोकांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण चालू केले आहे. मनपा मधील अनेक केंद्रावर VIP CULTURE चालू आहे. अनेक VIP लोकांच्या शिफारसीनुसार मनपा कर्मचांऱ्यावर दबाव टाकून ऑनलाईन नोंदणी न केलेल्या लोकांनाही प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे २४ – २४ तास ऑनलाईन बसून नोंदणी करणाऱ्यांवर, व २ ते ३ दिवस नोंदणी करणे करिता प्रयत्न करणाऱ्यांवर आणि ५ ते ६ तास रांगेत उभे राहणाऱ्या लोकांवर देखील अन्याय होत आहे. ज्या लोकांनी अनाधिकृतपणे लसीकरण केलेले आहे त्यांची मोजणी होत नाही व हे लसीकरण वेस्टेज झालेले  गिनले जात आहे. त्यातच सर्व लोकांना दुसरा डोस घेणेसाठी कसे शोधून काढणार हा देखील एक प्रश्नच आहे. पुढे लॉकडाऊन शिथिल झाल्यावर अनेक ठिकाणी प्रवास करण्यासाठी व इतर गोष्टी मिळवण्यासाठी VACCINE CERTIFICATE ची गरज भासणार आहे, त्यावेळी देखील मनपाला या VIP CULTURE मुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. 

तसेच अनेक ठिकाणी मनपा आरोग्य कर्मचार्यांना गावगुंडाकडून धमकावले जात आहे, जर तिथे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण ? म्हणून प्रत्येक लसीकरण केंद्राला पोलिस सरंक्षण देण्यात यावे, आणि लसीकरण केंद्राच्या बाहेर देखील SOCIAL DISTANCE फज्जा उडवला जात आहे, या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यासाठी देखील नियमावली लागू करण्यात यावी, हि नम्र विनंती.  0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post