लसीकरण केंद्रांवर धडकी भरवणारी गर्दी करोना वाढवणार! नियोजन संपूर्ण कोलमडले

 लसीकरण केंद्रांवर धडकी भरवणारी गर्दी करोना वाढवणार! नियोजन संपूर्ण कोलमडले नगर : नगर शहरातील लसीकरण केंद्रांवर पहाटे पासूनच लागणाऱ्या रांगा आणि १० ते १२ वाजे पर्यंत लस उपलब्ध आहे कि नाही यावरून होणार गोंधळ आणि सरते शेवटी लस उपलब्ध न झाल्याने आज लसीकरण होणार नाही अशी होणारी घोषणा. यातून निर्माण होणारी गोंधळाच्या परिस्थितीमुळे लसीकरण केंद्रावर जमणारी गर्दी, त्यात सोशल डिस्टंसिंग च्या उडणारा फज्जा यामुळे ही लसीकरण केंद्रे आहेत की सुपर स्प्रेडर्स असा प्रश्न पडतो. 


नगर शहरात सिव्हिल हॉस्पिटल , सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल आकाशवाणीकेंद्राजवळ, महात्मा फुले दवाखाना माळीवाडा वेशीजवळ , आयुर्वेद हॉस्पिटल, जिजामाता उद्यान भोसले आखाडा बुरूडगाव, केडगाव , तोफखाना नांगर पालिका दवाखाना आणि मुकुंदनगर ही आठ लसीकरण केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर पहाटेपासूनच लसीकरणासाठी नागरिक रांगा लावतात. मात्र त्यांना दुपारी १२ पर्यंत लास मिळेल किंवा नाही याची माहिती मिळत नाही. कधी कधी मर्यादित प्रमाणात लास आल्यानंतर लास उपलाब्द्ध असे पर्यंतच लसीकरण केले जाते व बाकीच्यांना पुढच्या दिवशी बोलावले जाते मात्र पुढच्या दिवशी लसीकरण नक्की होणार कि नाही याची माहिती दिली जात नसल्याने नागरिक रोजच या केंद्रांवर या केंद्रांवर गर्दी करतात. यात रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे हा प्रकार नसतो तर अनेकदा रांगेतील नंबर वरून हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार घडतात,बाचाबाची होते, अनेकदा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो मात्र इतके करूनही लसीकरणासाठी नंबर लागेलच  याची खात्री देता येत नाही. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post