लसीकरणासाठी राजकीय दबाव, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

 लसीकरणाकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांना दबाव,  संबंधित नगरसेवक, राजकिय नेत्यांवर गुन्हे दाखल करा, मनसेची मागणीअहमदनगर शहरात आपल्या समर्थकांचे त्यांच्या घरातील सदस्यांचे लसीकरण मागच्या दाराने करण्याकरीता आरोग्य कर्मचाऱ्यांना दमदाटी, दबाव आणण्याचा प्रकार शहरातील  नगसेवक तसेच स्थानीक राजकीय नेते करत असल्यामुळे सर्व सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईन मध्ये उभे राहून सुध्दा आश्या राजकिय लोकांमुळे लस मिळत नाही. ह्या घटना नगर शहरातील लसीकरण केंद्रावर घडतांना दिसत आहे. त्यामुळे नगरसेवक, राजकिय नेते यांच्या समर्थकांचे घरातील सदस्यांचे मागच्या दाराने होणारे लसीकरण बंद करा व जो नगरसेवक राजकिय नेते आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून दमदाटी लसीकरण करण्या करिता करत असेल अश्या लोकांवर गुन्हे दाखल कर, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे. तसेच नगरसेवक, राजकिय नेते यांच्या समर्थकांचे, घरातील सदस्यांचे लसीकरण नियमांप्रमाणे लाईन मध्ये उभे राहून करुण घ्या. जेणेकरून उन्हातान्हात उभे राहून ताटकळत सर्वसामान्य , ज्येष्ठ नागरिक यांना लसीकरण करता येईल व सर्वांना सारखा न्याय मिळेल अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी महानगर पालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post