स्लॉट कटकट बंद.. आता थेट केंद्रावर जाऊन लस घ्या

 स्लॉट कटकट बंद.. आता थेट केंद्रावर जाऊन लस घ्यानवी दिल्ली: आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. त्यामुळे कोविन अॅपवर नाव नोंदणी करून अपॉईंटमेट घेण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. केंद्र सरकारने नवे नियम जारी केले असून त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

18 ते 44 वयोगटातील व्यक्तिंना लसीकरणासाठी थेट केंद्रावर ऑनसाईट रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. दरम्यान, त्यांना Cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post