आ.लंके यांच्या कोविड सेंटरचा देशात डंका, उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनेही घेतली दखल


आ.लंके यांच्या कोविड सेंटरचा देशात डंका, उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनेही घेतली दखल नगर: आमदार निलेश लंके यांच्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरची चर्चा महाराष्ट्रच नव्हे तर आता देशभरात होऊ लागली.  उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने त्याची दखल घेतली आहे. रविवार् दि 23 मे रोजी उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी आमदार निलेश लंके यांच्याशी फोन द्वारे संपर्क करून संवाद साधला. या 20 मिनिटांच्या या चर्चेमध्ये शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरामधील कोरोना रुग्णांवरील उपचार या ठिकाणांची व्यवस्था याबाबत त्यांनी माहिती घेतली. अशाच पद्धतीचे कोविड सेंटर आपल्या राज्यामध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे तिवारी यांनी आ. लंके यांना सांगितले.

एक आमदार तेही स्वतःकडे पैसे नसताना गोरगरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी मोठे जम्बो कोविड सेंटर उभारतो. स्वतः या ठिकाणी राहून रुग्णांची सेवा ते करतात, त्यांना दिलासा देतात. याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला आमदार निलेश लंके आमच्याबाबत एक प्रकारे कुतूहल वाटत आहे. याची महती आता देशभर पसरली आहे. भाळवणी येथील कोविड सेंटर बाबत माहिती घेण्यासाठी लवकरच उत्तर प्रदेश सरकारचे शिष्टमंडळ पारनेरमध्ये येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post