जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध आणखी कडक, दुचाकीबाबत नवीन आदेश जारी

 

जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक, आता दुचाकीवर डबल सीट दिसल्यास कारवाईनगर: जिल्हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांकामी अत्यावश्यक सेवा व आदेशात नमुद इतर बाबी वगळता निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.तथापि, सूट असलेल्या सेवा/बाबीकरीता मोठया प्रमाणावर दुचाकीवर दोन व्यक्ती (डबलशिट) फिरत असल्याची बाब  निदर्शनास आल्याने प्रशासनाने १ मे रोजी नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता जिल्हयामध्ये दि.02/05/2021 ते 15/05/2021 या कालावधीत दुचाकीवर एकपेक्षा अधिक व्यक्तीस (वैदयकीय कारण वगळून) प्रवासास मनाई करीत आहे.

उपरोक्त आदेशाची पोलीस विभाग, परिवहन विभाग व स्थानिक प्राधिकरणाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post